जयंतीचा उत्सव …

युगानुयुगे माणूसपण नाकारलेल्या समाजाला .. माणसात आणणाऱ्या बाप माणसाचा जन्मदिवस… दरवर्षी साजरा  होतो…अगदी सणाप्रमाणे… या सणाची तयारी महिनाभर अगोदरच करत असतो कार्यकर्ता… त्यानं वर्षभर साचवलेली रक्कम…. कार्यक्रमासाठी लावत असतो कार्यकर्ता… पायाला बांधून भिंगऱ्या… वाड्या, वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्या  अक्षरशः पिंजून काढत असतो कार्यकर्ता… अरे ssssss!  माझ्या बापाची जयंती आहे…!  म्हणत … भावुक होऊन वावरत असतो…

Loading

Read More