अनवर अली शेख,
बहुजन संघटक
पुणे शहर आणि परिसरात ग्रामीण भागात आपण नेहमी आजच्या आधुनिक काळात ही डोंबारीखेळ दाखवणारी मंडळी पहात-च असाल लहान मुले,मुली दोरी वर चालून आणि जीव धोक्यात घालून अवघड कवायत करून पैसे मागतात त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील बहीण भाऊ असे यांची पूर्ण मंडळीच असते,त्यांची खाना-बदोष जीवनी अर्थात रोज गाव बदलणे फक्त पोट भरण्यासाठी जन्माला आले की काय अशी गत असते त्यांची मुलं लहान वयात अति अवघड जीव धोक्यात घालून कवायती करत मोठे होतात त्यांना शाळा ,शिक्षण काही माहित नसते
रस्त्यावर,सिग्नल किंवा एखाद्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी ते खेळ दाखून पोट भरतात आणि एकीकडे आपण चंद्रावर पोहचलो आणि दुसरीकडे ही सत्य परिस्थिती आहे की शिक्षणाचं माहेर घर भूषवणाऱ्या शहरात आणि परिसरात अनेक अशी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत .
पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी जीवघेण्या कवायती दाखुन पोट भरतात आणि शहरातील शेकडो सुज्ञ नागरिक त्यांना वगळून जसे की ते खेळ दाखवून पोट भरण्यासाठी जन्माला आले आहे किंवा ते या जगाचे नाही दुसऱ्या जगातून आले की काय असे दुर्लक्ष करून आपल्या कामात निघून जातात,तर एकीकडे बाल विकास योजना,समित्या, संघटना,योजना, शीक्षणावर मोठ मोठे भाषणे,आणि दुसरीकडे रस्त्यावर खेळ दाखुन सिग्नल वर भिक मागून पोट भरणारी मुलं, शिक्षणाच्या वयात शिक्षणापासून दूर राहून भीक मागून पोट भरणारी मुलं, शिक्षणाच्या वयात फक्त पोट भरण्यासाठी रस्त्यावर जीवाचे रान करत आहे, त्यांना शिकण्याचा अधिकार नाही का, विश्व गुरू होऊ पाहणाऱ्या भरतात आज पण शहराच्या आसपास राहणारे अनेक, मुलं,मुली शिक्षणा पासून दूर आहे आयुष्य जगण्या साठी जीवाचा आटापिटा करीत असतात.
यांच्याबाबत कोण विचार करणार असा प्रश्न मला नेहमीच पडतो ?