भाऊसाहेब मोरे: आंबेडकरी समाज निर्माण करण्यासाठी उभं आयुष्य वेचणारा जयभीमवाला

मराठवाडा जेवढा सोशिक आहे तेवढाच आक्रमक !सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा कायम प्रयत्न असतो मराठवाड्यातील open hearted माणसांचा. इत:पर त्यांना कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जागा कशी दाखवून द्यायची हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमोकळं करताना या संग्रामातील दलितांच्या योगदानाची म्हणावी तशी नोंद घेतली गेली नाही याची खंत वाटते. काहींना तर एकाचवेळी हा लढा दोन आघाड्यांवर द्यावा लागला. मनुवाद्यांच्या जोखडातून मुक्ती आणि दुसरीकडे निजामाच्या राजवटितून सुस्कारा. दलित चळवळीच्या बाबतीतदेखील हेच झाल्याचे जाणवते. मराठवाड्यातील नेते, कार्यकर्ते, जनता संघर्षात कायम आघाडीवर होती. पण ते Documentation मध्ये कमी पडले !आंबेडकरी समाज निर्माण करण्यासाठी एक व्यक्ती काय करू शकते याचं ठळक आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक दलित मित्र स्मृतिशेष भाऊसाहेब मोरे !

एक दृष्टिक्षेप भाऊसाहेबांच्या धगधगत्या प्रवासावर…

*डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 1938 ला पहिल्या मक्रणपूर परिषदेचे आयोजन, जी त्यांच्या जाण्यानंतरही अखंडितपणे दरवर्षी #जयभीम_दिन म्हणून भव्य स्वरूपात आयोजित व साजरी केल्या जाते…

*शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि RPI चे पहिले मराठवाडा अध्यक्ष

*पुणे येथे शिक्षण घेऊन मराठवाड्यातील पहिले पदवीधर

*मराठवाड्यातील पहिले राजपत्रित अधिकारी

*बाबासाहेबांच्या आदेशावरून सामाजिक कार्यासाठी नोकरीचा त्याग

*भूमिहिन सत्याग्रहाचे प्रवर्तक आणि आयोजक असल्याने तुरुंगवास

*औरंगाबाद येथे महाविद्यालय स्थापन करण्याची आमखास मैदानावरील परिषदेत आग्रही मागणी

*ग्रामीण भागातील जातीय अत्याचाराविरूद्ध न्यायासाठी लढा आणि लाठी दस्त्यांची स्थापना.साबळे मामा, के एस पठारे वस्ताद, रुंजाजी भारसाखळे हे टिमचे सदस्य होते.

*मराठवाड्यातील हजारो कार्यकर्त्यांसह नागपूर येथील धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्यात सहभाग

*भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात पहिल्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचे आयोजन

*1938 मध्ये बाबासाहेबांच्या उपस्थितीत निजामाच्या विरोधात परिषदेचे आयोजन. दलितांमध्ये जागृती आणि प्रबोधनासाठी आयुष्यभर संघर्ष…

*बाबासाहेबांच्या प्रती शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहत जय भीम या क्रांतिमंत्राचा प्रचार-प्रसार !’जय भीमचा’ सर्वप्रथम उद्घघोष तर केलाच; पण हा क्रांतिमंत्र जगण्यासाठी जाज्ज्वल्य मापदंड घालून देणा-या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर विनम्र अभिवादन !🙏🙏🙏जय भीम !जय संविधान !!जय भारत !!!

@ भीमप्रकाश गायकवाड, ‘मूकनायक’रविराजपार्क, परभणी(16 सप्टेंबर, 2023)

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *