महाराष्ट्रातील SC/ST/OBC आणि मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील !

Bahujan Sanghtak

पुरोगामी महाराष्ट्र हा आता नावापुरताच पुरोगामी राहिला आहे. मागच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रामध्ये विचारासाठी राजकारण होत नसून ते केवळ सत्ता, पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपत्ती आणि स्वतःची घराणेशाही टिकवण्यासाठी निवडणुकांचा वापर होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मतदार जनता ही फक्त लोणच्यासारखी वापरण्यात येत आहे.या पुरोगामी महाराष्ट्रातील शक्तिशाली मोठ्या संख्येने असलेले माळी,धनगर,विस्थापित मराठा आणि महार, (बौध्द ) मांग,मुस्लिम समाजातील लोकांची भविष्यात काय अवस्था होईल हे सांगता येत नाही ? त्यामुळं होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तहात हरण्यापेक्षा लढाई लढणं ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती अतिशय कौतुकास्पद आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्रातील दिवसभर बुद्ध शिवराय,ज्योतिबा,बाबासाहेब, अण्णाभाऊ म्हणणाऱ्या आणि रात्री मात्र ठाकरे पवार गांधी म्हणणाऱ्या चोंबड्या लोकांनी सुद्धा समाजाच्या भावी संकटावर मात करण्यासाठी आत्ताच सुधारले पाहिजे.

वर्तमानात महाराष्ट्राचे राजकारण खूप विचित्र अशा परिस्थितीत येऊन थांबले आहे.यंदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या चौरंगी आणि पंचरंगी होतानाच पाहायला मिळतील. कंबरड मोडून वाकलेले शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची अवस्था म्हणजे वरून चक पक आणि आतून भग भग अशीच झाली आहे.तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांची आघाडी हे ही छाती ठोकून विजयाचा दावा करू शकत नाहीत. राजकारणामध्ये ज्या पद्धतीने तोडा आणि फोडा व राज्य करा अशी परिस्थिती निर्माण केली.याचा जवळपास सर्वांनाच फटका बसणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

तर दुसरी महत्त्वाची बाब अशी की, राज्यातल्या महाविकास आघाडीने या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत जाहीर केलेल्या जवळपास 45 लोकसभा उमेदवारांमध्ये केवळ आठ ओबीसी आणि 0.00 मुस्लिम अशाप्रकारे तिकीट वाटप केले आहे.दुसऱ्या बाजूला असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या छोट्या मोठ्या आघाडी पक्षांनी ओबीसी आणि मुस्लिमांना डावलण्याचा मोठा प्रयत्न चालू केलेला आहे.आणि ही वास्तविकता आहे की भारतीय जनता पार्टी ही मनुवादी विचाराची असल्याने देशातील दलित आणि मुस्लिमांना टारगेट करण्यासाठी त्यांना राजकीय पटलावर स्थान देत नाही.

महाराष्ट्र लोकसभेच्या राजकारणातील अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यातील मुस्लिम आणि बहुसंख्या ओ.बी.सी समाजाने आता एकमेव पर्याय म्हणून बाळासाहेबांच्या वंचित आघाडीला स्वीकारणे काळाची गरज बनली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत ज्या प्रकारे लोकसभा तिकिटांच वाटप केला आहे.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय समीकरणाचा समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यामुळे राज्यातील उपेक्षित वंचित आणि समस्याग्रस्त ओ.बी.सी आणि मुस्लिम समाजाने बहुजन आघाडीला तिसरा पर्याय म्हणून स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल.

राज्यातील ओ.बी.सी आणि मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीला तिसरा राजकीय पर्याय म्हणून स्वीकारण्यास अनेक कारणे सुद्धा आहेत.जसं की,राज्यातील मुस्लिमांच्या विकासाचा सच्चर कमिशन अहवाल मागच्या पंधरा/वीस वर्षापासून धुळखात पडलेला आहे.तर दुसऱ्या बाजूला ओ.बी.सीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्याची पिलावळं करताना दिसत आहेत.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या काँग्रेस,शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओ.बी.सीच्या आरक्षणाला वाचवण्यासाठी कोणती ही महत्त्वाची भूमिका मागच्या गोंधळात बजावली नाही.हे ही तितकेच खरे आहे.अशा परिस्थितीमध्ये राज्यातील ओ.बी.सी आणि मुस्लिमांना बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय महाराष्ट्रात तर नाही.त्यामुळे लोकसभेच्या राजकारणामध्ये ओ.बी.सी आणि मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडणे ही काळाची गरज बनली आहे.हे आता सर्वांनी नीटपणे ध्यानात घेतले पाहिजे.

महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदार संघामध्ये स्वतःला ताकतवर आणि बलाढ्य समजणाऱ्या उद्धवसेना,शिंदे सेना,काँग्रेस,शरद पवार एन.सी.पी या राजकीय पक्षांची काय अवस्था आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रकारे लोकसभा मतदारसंघात तिकीट वाटपा वरून काही महत्त्वपूर्ण कार्ड (बारामती,रामटेक,धुळे, अमरावती इत्यादी अनेक ठिकाणी) असे चालवले की,इथल्या शरद पवार सारख्या मुरब्बी राजकारन्यांची सुद्धा गोची झाली आहे.ही गोष्ट आता सर्वांनी कबूल केली पाहिजे.तर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की,48 लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आघाडीच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण करण्यासाठी जातीय समीकरणांना मजबूत करण्याचं काम बाळासाहेबांनी केला आहे.खरं तर इथल्या भारतीय जनता पार्टी आणि या कंबर मोडलेल्या नेत्यांची सुद्धा अवस्था खूप वाईट झालेली दिसून येत आहे.ही अंतर्गत वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे राज्यातील मुस्लिम बांधव आणि ओबीसी बांधवांनी नाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत ज्यांनी ओबीसी आणि मुस्लिमांच्या जीवावर राजकारण केले परंतु त्यांच्या सर्वांगीण विकासाचा कधीही विचार केला नाही.गांधीवादी आणि मनुवादी राजकीय पक्षांना सोडचिट्टी देऊन,यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये भविष्यातील उद्भवणाऱ्या समस्यांचा वेध घेऊन राज्यातील ओबीसी आणि मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचा सक्षम राजकीय पर्याय म्हणून स्वीकार करणे गरजेचे बनले आहे.अन्यथा याचे गंभीर असे परिणाम येणाऱ्या काळामध्ये या राज्यातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी आणि मुस्लिमांना भोगावे लागणार यात तीळ मात्र शंकाच नाही !

मागच्या दहा वर्षांमध्ये आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टीने संविधानाची पायमल्ली करत,भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणत,भारतीय लोकशाहीची चिरफाड करत भारतीय नागरिकांना हुकूमशाहीच्या अधिपत्याखाली आणण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे,आणि या प्रयत्नास छुपा पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस,शरद पवार,उद्धव ठाकरे यांचा ही नकली पुरोगामीत्वाचा बुरखा टरटरा फडण्याची वेळ राज्यातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी आणि मुस्लिम मतदार बांधवांवर आलेली आहे.ही वास्तविकता राज्यातील तमाम मतदारांनी समजून घेऊन येनाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपत्ती आणि घराणेशाही वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मुजोर लोकांना या हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचा आहे.ही बाब आता सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे.

लेखक : विजय अशोक बनसोडे
जि.संघटक भारतीय बौद्ध महासभा 8600210090
📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢

📢📢

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *