वामनदादा कर्डक यांना डी लिट.

प्रदीप निकम, प्रतिनिधी बहुजन संघटक, छ.संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन (MGM) विद्यापीठ तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांकडे डिलीट पदवी सोपविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा, चळवळ आणि तत्त्वज्ञानाची उद्दीष्ट्ये सहज- सोप्या आणि साध्या पण परिणामकारक शब्दांनी वामनदादांनी आपल्या गीत आणि गायनातून मांडले. त्यांनी चार कवितासंग्रह लिहिले. “माझ्या जीवनाचं गाणं” हे आत्मचरित्र आहे. काही चित्रपट गीते ही वामनदादांनी लिहिली आहे. दलित चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणून वामनदादा कर्डक यांची ओळख आहे. त्यांनी लोकगीते, प्रबोधन गीते, आंबेडकर गीते, बुद्ध गीते, मानवतावादी गीते इत्यादी मराठी हिंदी अशा भाषांतून दहा हजारांहून अधिक गीते लिहिली व गायली आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळीतील असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत सन्मानाने जगण्याचे बळ दिले. त्यांनी लिहिलेली मानवी मनाची जोपासना गौरवाची वाटत असल्यामुळे त्यांना मरणोत्तर डि.लीट पदवी सन्मानित करण्यात येत आहे. असल्याचे कुलगुरू डॉक्टर सपकाळ यांनी सांगितले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *