वामनदादा…
तुझ्या शबनम झोळीतून प्रतिभेच्या खोलीतुन, भाषेच्या बोलीतून आणि प्रत्येक कवितेच्या ओळीतून, भीम आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो घड़ताना , लढताना आई होऊन गोंजारताणा वादळ होवून घोंगावताना. इतकं साध सोपं सरळ तुझं लिखाण खर तर तू शब्दांचा जादूगर पण तुझी कविता प्रेयसीच्या गालावर भिजलेच्या अंगावर किंवा मंद दिव्याच्या खाली रंगलेल्या प्रणयात कधीच रमली नाही कारण भीम विचारांची…