वामनदादा…

तुझ्या शबनम झोळीतून

प्रतिभेच्या खोलीतुन, भाषेच्या बोलीतून आणि प्रत्येक कवितेच्या ओळीतून,

भीम आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो

घड़ताना , लढताना

आई होऊन गोंजारताणा

वादळ होवून घोंगावताना. 

इतकं साध सोपं सरळ तुझं लिखाण

खर तर तू शब्दांचा जादूगर

पण तुझी कविता प्रेयसीच्या गालावर

भिजलेच्या अंगावर किंवा मंद दिव्याच्या खाली रंगलेल्या प्रणयात

कधीच रमली नाही

कारण भीम विचारांची चोपड़ी तुझ्या खोपडीतून  कधी क्षमली नाही.

तुफानातला दिवा होऊन

मी वादळ वारा म्हणत तू जागवत राहिलास वस्त्या आणि वाडया.

डोक्यावर, खांद्यावर पेटी घेऊन तू तुडवत राहिलास इथल्या वाटा.

म्हणूनच तर टाटा बिर्ला कड़े आपला “वाटा” मागायला घाबरला नाहीस

आन समाज प्रबोधन करण्यास मागे हटला नाहीस.

महाकवि म्हटलं की तूचं दिसतोस

आज मात्र परिस्थिती वेगळी झालीय

तुझ्याचं गाण्याच्या ओळी ढापुन इथे

कविंचि जत्रा भरते

ज्यांना अलंकाराचा वास ही नाही

त्यांच्या नावापुढे गीतकार वाचतो आम्ही

गायकांच मानधन आता मानधन राहील नाही दादा

” जामधन” झालय

अस्सल प्रबोधनाचा मनोराच ढासळलाय, पूरा कोसळलाय.

कुणी कुणी तर पूर्ण “पाकीट” हातात आल्या शिवाय स्टेजवर चढ़तच नाही

असं आलय आमच्या कानावर

आणि अनुभवास ही….

आजकल गरम गाण्याची खुपचं मागणी असते 

अस एका गीतकारा कडून ऐंकल.

प्रतिक्रीयेसाठी मी खरचं निशब्द होतो.

कविचा/ गीतकारांचा संयम सुटू लागलाय

भावनेच्या भरात काहीही लिहू लागलित तुझी लेकर

जे तुला कधीच आवडल नसत

माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या शाहीराचे एक गाणं आहे

अस बाबा ही बोलले नसते

इतके आम्ही बेशिस्त वागतो

रियल पणा हरवून गेलाय,

रियल ला कमर्शियल ने गिळून टाकलयं

इतकं आपलं आंबेडकरी संगीत विश्व बदलुन गेलय.

पण या बदलात,

जी तेव्हा ही होती 

ती आजही कायम आहे

कविंचि फरफट.

आता कविचे डोळे कवीनेच पुसायचे

तरी ही ……

तुझ्या गाण्याने इतिहास रचायचे

सांग ना वामनदादा,

शब्द तुला कसे सुचायचे.

कवी -अमोल कदम

  नवी मुंबई.

8425059794

Thanks & Regards

Amol Ramchandra kadam

call and whatsapp

8425059794

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *