रमाई :- काव्य प्रकार : ओवी

काव्य प्रकार : ओवी

थोर माय ती माऊली |

किती कष्टाने झिजली |

अशी पत्नी गं लाभली |

धन्य तो भीमराया ||

नाही रुसे दागिन्यास |

समाजाची लागे आस |

जपे किती साहेबास |

जनभल्यासाठी गं ||

विके गोवऱ्या थापून |

ऊभी सावली होऊन |

पोटी दुःख पचवून |

फुलवे आंबराई ||

अंगी ठिगळाची चोळी |

डोई जळणाची मोळी |

भीमाची रमाई भोळी |

कुलवंताची लेक ||

भरली कूस आनंदात |

काळ करी कैसा घात |

नाही आडका हातात |

आसवे पापणीत ||

अशी भीमाची रमाई |

दीनदुबळ्यांची आई |

अंतरंगी ठाई ठाई |

तिच्या स्मृतीचा गंध ||

✍️ अस्मिता युवराज

मोबा : ९१६७००२७०६

विरार पूर्व, ४०१३०३

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *