गिर गिर गिरवल अक्षर झाले साक्षर
बदलली जिंदगानी
होता शिक्षणानं ज्ञानी
गाते साऊ फुलेंची गाणी
उंबऱ्या आतलं जीवन माझं
होती किती लाचारी
भीमच्यामुळे लाभले पंख
घेते गगनी भरारी
पतिराजांसंग नांदतेया सुखानं राणीवाणी
होता शिक्षणानं ज्ञानी
गाते भीमाची आज गाणी
फुलें साऊंनी उजळल्या कैक ज्ञानज्योती
हक्क देउनी मला भीमानं मोडल्या चालीरीती
अबला नारी सबला झाली तिची बदलली कहाणी
होता शिक्षणानं ज्ञानी
गाते साऊ फुलेंची गाणी
दुःखात झुरली कष्टात झिजली
ना झुकली संकटांत
भीमाची स्फूर्ती होऊनि ज्योती
जळली दिनरात
तिच्यासाठी सर्वकाही तिचा कुंकवाचा धनी
होता शिक्षणानं ज्ञानी
गाते रमाईची गाणी
रुबाबात ,जाता विहारात मी जोडीनं फुलं वाही
शांती सुखाने भरल जीवन कमी कशाची नाही
विनय भावानं करी नमन भीम बुद्धाच्या चरणी
होता शिक्षणानं ज्ञानी
गाते तथागथाची गाणी
ज्योती गायकवाड ( रुपाली शिंगे )
नवी मुंबई
९३२६०८४८७३